आ. ऍड. आकाश फुंडकरांनी केला अग्निविर चा सत्कार
खामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड झालेल्या युवकाचा सत्कार आ अँड आकाश फुंडकर यांनी केला.
खामगाव मतदार संघातील खामगाव तालुक्यातील मांडका येथील गरीब कुटुंबातील शेतकरी पुत्र चिंतामण महादेव भिसे याने अथक परिश्रम करून भारतीय सेनेची अग्नीवीर परीक्षा पास केली. त्याने छत्रपती संभाजी नगर येथे मैदानी चाचणी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर अमरावती येथे लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची चांगली कामगिरी पाहून भारतीय सेनेने त्याला अग्नी वीर म्हणून निवड केली आहे. काही दिवसात तो कर्नाटक येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. याची माहिती मिळताच चिंतामण भिसे याला आ अँड आकाश फुंडकर यांनी आपल्या टावर चौक येथील भाजपा कार्यालयात विशेष निमंत्रित केले. आणि त्याचा आज पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी अग्निवीर चिंतामण भिसे यांच्यासोबत त्यांचे गावकरी भाजपा तालुका सरचिटणीस संतोष घोराडे, अजय लोड ,अमोल भिसे, पुरुषोत्तम भिसे यांचेसह भाजपाचे जेष्ठ नेते रामकृष्ण भारसाकळे, मनोज घाटे, गजानन मोरखडे, रामेश्वर राहणे, दत्ता उगले, बाळूभाऊ पाटील,आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ अँड आकाश फुंडकर यांनी अग्निवीर चिंतामण भिसे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment