उडान गौरव हिरकण्यांचा कार्यक्रम संपन्न 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-स्थानिक श्रीमती सुरज देवी रामचंद  मोहता महिला महाविद्यालयात 2023 -24 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन विविध खेळ व क्रीडा स्पर्धांमध्ये कलर कोट व मेडल प्राप्त  हिरकण्यांचा सन्मान चिन्ह देऊन खेळ व शारीरिक शिक्षण विभागातर्फे सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचा अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती चांदे  होत्या.यांनी जीवनात खेळ किती महत्त्वाचे आहे ,आपल्या शालेय जीवनातील त्यांचे विविध खेळ स्पर्धातील त्यांचा सहभागाचा अनुभव व त्यातून आलेल्या यश व अपयशाचे  कथन ,खेळाचे  व व्यायामाचे फायदे त्यांनी विद्यार्थिनीं सांगितले . कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ऐ.के. नॅशनल हायस्कूलच्या प्राचार्या सौ. नंदा सुहास उदापुरकर होत्या.  


यांनी विद्यार्थिनींच्या शालेय जीवनात तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शाळांमधील खेळाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे .यश अपयश दूरचा भाग आहे. परंतु सध्या स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचा त्यांचा जिल्हा, विभागीय, राज्य, नॅशनल ,ऑल इंडिया  लेव्हल  सहभाग व त्यातील मिळालेले प्राविण्य यावर शाळांचा व महाविद्यालयांचा मूल्यांकनचा दर्जा अवलंबून असून, खेळ महत्त्वपूर्ण अविभाज्य घटक विद्यार्थ्यांचा तसेच शाळांचा  व महाविद्यालयांचा आहे, असे आपल्या  भाषणातून संबोधित केले. कु. स्नेहल विजयसिंह डाबेराव बीए फायनल हिला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन तायक्वांडो तसेच रेसलिंग स्पर्धेत 67 किलो वजन गटात गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल तसेच आंतर विद्यापीठ तायक्वांडो व रेसलिंग स्पर्धेत राजस्थान तसेच मोहाली पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत अमरावती विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल व दुहेरी कलर कोटची मानकरी झाल्याबद्दल तसेच बॉक्सिंग मध्ये सिल्वर मेडल जुडोमध्ये ब्राँझ मेडल मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथीं तर्फे गौरव करण्यात आला. कु. प्रतीक्षा श्रीकृष्ण वानखेडे हिला अंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून  आंतर विद्यापीठ बॉक्सिंग 70 किलो वजन गटात मोहाली राजस्थान येथे विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल कलर कोटची मानकरी ठरल्याबद्दल तसेच कु. भाग्यश्री संतोष खेडकर 68 किलो रेसलिंग स्पर्धेत सिल्वर मेडल तसेच बॉक्सिंग मध्ये सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल ,कु. माधुरी संजय येऊतकर ,कु.दिशा रूपेश आठवले बॉक्सिंग सिल्वर मिळविल्या बद्दल ,कु.श्रद्धा दर्शन मुंग्यालकर  हिने बॉक्सिंग मध्ये बान्झ मेडल मिळाल्याबद्दल या सर्व खेळाडूं हिरकण्यांचा महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .तसेच अध्यक्षांच्या हस्ते  2024-25 खेळ व शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली व कार्यकारणी घोषित करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ.सीमा देशमुख यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post