ज्ञानोबा - तुकोबा' पुरस्कार प्राप्त ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांचा जाहीर सत्कार
खामगांव : महाराष्ट्रशासनाचा सन २०२४ चा 'ज्ञानोबा-तुकोबा' पुरस्कार रामायणाचार्य तथा ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. श्री. संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला. याबद्दल मराठा पाटील सेवा मंडळ खामगांवच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सद्गुरु श्रीधर महाराज सेवा मंदिर, चोपडे यांचा मळा, घाटपुरी रोड, खामगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.
कथा किर्तनातून धर्मप्रचारासोबतच १८००० पेक्षा जास्त गायींचे संगोपण, ४८० मंदिरांचा जिर्णोध्दार, २८०० गावांमध्ये साप्ताहिक महाआरती ९०० गावांमध्ये दैनिक रामफेरी बालसंस्कार शिबिरे यासह अनेक सामाजिक सेवा प्रकल्प त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कारित केले आहे. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. तुकाराम महाराज संखारामपूर, भागवताचार्य श्री शंकरजी महाराज जागृती आश्रम, ह.भ.प. गोपाळराव महाराज उरळ यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. तसेच याच कार्यक्रमात भारुड सम्राट श्रीराम महाराज खेडकर यांचा सुध्दा सत्कार करण्यात येत आहे.
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर लांजुडकर व सचिव आशुतोष लांडे तथा समस्त कार्यकारिणीने केले आहे.
Post a Comment