एसटी बस व आयशर ची टक्कर :सहा जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी


मृतकांची नावे
बस वाहक बंडू तुळशीराम बारगजे (वय 52, वडगाव ढोक, ता. गेवराई, जि. बीड), प्रवासी राहिबाई रंगनाथ कळसाईत (वय 65, रा. मेहकर), पंचफुला भगवान सोळुंके (वय 65, रा. सुरडी) व अन्य एक प्रवासी, आयशरमधील सतीश देविदास नाईक (29, रा. मुंरादेवी, जि. अमरावती), आयशर चालक जब्बार शेख (52, मुरांदेवी, जि. अमरावती).

जालना जनोपचार न्यूज नेटवर्क : एसटी बस आणि आयशर वाहनाची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी झाल्याची दुर्दैवी दुर्घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास जालना - वडीगोद्री मार्गावरील शहापूरमठ तांड्याजवळ घडली. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोळंबली होती. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 21 जखमींपैकी सहा गंभीर असून, मृतांत चार जण एसटीतील तर दोघे आयशरमधील असल्याचे समजते. जखमींना प्रथम अंबड उपजिल्हा रुग्णालयात, नंतर जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post