निरंकारी मिशनच्या भक्तांनी साजरा केला मुक्तीपर्व दिवस
खामगांव : १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तर सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने निरंकारी जगतात हा दिवस आध्यात्मिक स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून मुक्ती पर्व म्हणून साजरा करण्यात आला.
ज्यांनी संपुर्ण जीवन मानव सेवेसाठी समर्पित केले अशा निरंकारी संताच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा घाटपुरी रोड, खामगांव येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी संपूर्ण जीवन मानवतेसाठी समर्पित केले म्हणून त्यांच्या जीवनातून या दिवशी धडा घेतला जातो. प्रेम, नम्रता व सहनशीलता ह्याच मानवाला यशस्वी बनवु शकतात. यावेळी निरंकारी बंधु भगिनींनी विविध मराठी, हिंदी, पंजाबी, गीतां मधुन एकतेचा संदेश दिला. तर विचारां मधुन सुध्दा जीवन जगण्या बरोबरच एकत्वाचा संदेश दिला.
Post a Comment