संस्कार भारती बुलढाणा जिल्हा शेखेचा उदघाटन सोहळा आयोजित
भगवान श्रीकृष्णावर गाण्यांचा जाहीर कार्यक्रम
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क :-संस्कार भारती बुलढाणा जिल्हा शाखेचा उदघाटन सोहळा रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी टिळक स्मारक महिला मंडळ, खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पावन पर्वावर खामगावकर रसिकांकारिता भगवान श्रीकृष्णावर आधारित खामगाव शहरातील नामवंत व नवोदित गायकांनी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला संस्कार भारती चे विदर्भ प्रांताचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये संस्कार भारती, बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी ठीक १० वाजता नामयोगी प.पू.श्री.दिढे मामांची पाद्यपूजा संपन्न होणार आहे. तर गाण्याचा जाहीर कार्यक्रम खामगाव येथे टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ठीक ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक श्री.बाळासाहेब काळे, तालुका संघचालक श्री.संतोष दशमुख, नगर संघचालक श्री.प्रल्हाद निमकंडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री श्री.अमोल अंधारे, खामगाव मतदार संघाचे आमदार श्री.आकाश फुंडकर यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच संघ परिवाराचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. संस्कार भारती ही साहित्य, संगीत, नृत्य,नाट्य, चित्रकला, लोककला, रांगोळी, प्राचीन कला अश्या विविध कला क्षेत्रात काम करते. संस्कार भारती खामगाव मागील दोन वर्षांपासून पाडवा पहाट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करीत आहे. खामगाव मधील नागरिकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारती बुलढाणा जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी केली आहे.
Post a Comment