संत निरंकारी मिशनच्या खामगाव शाखेतर्फे रविवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
(खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क) संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन,खामगांव ब्रँच तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि.१ सप्टेंबर रोजी-संत निरंकारी सत्संग भवन,घाटपुरी रोड, खामगांव येथे सकाळी ९ ते २ या वेळेत करण्यात आले आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण भारतात संत निरंकारी मंडळामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव ब्रँच येथे मुखी अजय छतवाणी तथा त्यांच्या सोबतच सर्व महात्मा तथा बहेनजी या रक्तदान शिबिरासाठी जनजागृती करत असून "रक्तदान म्हणजे जीवनदान,वाचवी रुग्णाचे प्राण|"या भावनेतून शेकडो निरंकारी भक्त रक्तदानासाठी पुढे येतात. रक्तदान ही सर्वांचीच जबाबदारी असुन या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या मानव सेवेच्या महान कार्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.
Post a Comment