खुनाच्या गुन्हयात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व रू. ५,०००/- दंड

जिल्हा व सत्र न्या.सरोज मने - गाडेकर यांचा निर्वाडा

हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क :- बाचाबाची नंतर रागाच्या भरात  एकच खून केल्या प्रकरणातील आरोपीला  येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सरोज माने गाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच पाच हजार रुपये दंड,  दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

याबाबत पार्श्वभूमी अशी की,मौजे शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील अरोपी ज्ञानेश्वर हरीभाऊ कुंभकणे व मयत स.अफसर पि.स. रसुल दोघे रा.शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली है दि.२०.०३. २०१९ रोजी मी. शेवाळा गावामध्ये मारोती मंदीराच्या पाठीमागे सार्वजनिक रोडवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामावर मजुर म्हणुन गुत्तेदारच्या हाताखी काम करत होते दुपारी ११.३० ते १२.०० वा. च्या सुमारास होळीचा सन असल्यामुळे लवकर काम करून मिस्त्री व ईतर मजुरदार यांनी अरोपी ज्ञानेश्वर कुंभकर्ण व मयत स.अफसर स.रसुल यांना कामावरचे साहित्य एकत्र करून घेवुन येण्यास सांगुन ते थोड्या अंतरावर चहा घेण्यास गेले, तेवढ्या वेळात मयत स.अफसर स. रसुल यास अंगावर का धुंकला या कारणावरून अरोपी ज्ञानेश्वर कुंभकर्ण याने रागाच्याभरात बाचाबाची करून कामावर असलेले लोखंडी फावडयाने मयताच्या डोक्यावर व तोडावर मारहान करून गंभीर जखमी केले.

जखमी स.अफसर यास घरच्यांनी व ईतर लोकांनी ग्रामिण रूग्णालय, आ.बाळापुर तेथे नेले व तेथुन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे ईलाजासाठी नेले परंतु इलाज चालु असतांना स.अफसर याचा मृत्यू झाला म्हणुन मयताचे वडील स. रसुल स.हयात यांनी पो.स्टे. आखाडा बाळापुर येथे अरोपी ज्ञानेश्वर याने त्याच्या मुलास जिवे मारल्याची फिर्याद दिली. सदर प्रकरणी आ. बाळापुर पो.स्टे. येथे गु.रं.नं ६२/२०१९ कलम ३०२ भादवी अन्वये अरोपीविरूध्द गुन्हा नोदवुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि अच्युत व्ही.मुपडे यांनी केला. प्रसतुत प्रकरणात्त मा. न्यायालयात सत्र स्वटला क.५४/२०१९ देण्यात आला. सदर प्रकरण हे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने-गाडेकर यांचे समोर चालले सदर प्रकरणात सहा. सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी एकुण १७ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. यामध्ये मा. न्यायालयात फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, साक्षीदार व तपासीक अंमलदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असुन रासायनिक पृथकरणाचे अहवाल महत्वाचे ठरली असुन मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने-गाडेकर हिंगोली. यांनी आज दि.२३.०८.२०२४ रोजी सत्र खटला क.५४/२०१९ सरकार वि. ज्ञानेश्वर या प्रकरणात अरोपी ज्ञानेश्वर हरीभाउ कुंभकर्ण यास कलम ३०२ भादवी अन्वये दोषों ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व रक्कम ५.००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली

उपरोक्त प्रकरणात सरकार पक्षातर्फे श्री एन.एस. मुटकुळे सरकारी वकील यांनी बाजु मांडली व त्यांना श्री.एस.डी.कुटे व श्रीमती सविता एस. देशमुख सरकारी वकील यांनी सहकार्य केले व तसेब मपोहे/सुनिता जे धनवे कोर्ट पैरवी पी. स्टे आखाडा बाळापुर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post