लाडकी बहिणीचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट पासून होणार जमा: काहींच्या खात्यात जमा झालेत

बुलडाणा जनोपचार न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता दि. 17 ऑगस्टपासून बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी बँक खाते आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख 87 हजार महिलांनी फॉर्म भरलेले आहे. यातील पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या बँक खात्यात 17 तारखेपासून पहिला हप्ता जमा होण्यास सुरूवात होणार आहे. योजनेच्या लाभासाठी सदर केलेल्या फॉर्ममध्ये आधार सिडिंग बँक खाते दिलेले असतील, त्यांच्या खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास तात्काळ बँक खाते आधारशी संलग्न करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंंदणी पूर्ण

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच, ज्या महिला भगिनींना या दोन महिन्यांचा लाभ मिळाला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यात एकूण 3 महिन्यांचा थेट लाभ मिळणार असून 4500 रुपये त्यांच्या बँक अकाऊंटवर जमा होतील, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post