लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे वृक्षारोपण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीद्वारे ४ जुलै रोजी क्लबच्या - पदाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून नांदुरा रोडवरील सेनापती हॉटेल पासून वृक्षारोपणाची सुरूवात केली. या महिन्यात क्लबतर्फे खामगांव शहर परिसरात २००० वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचा संकल्प घेण्यात आला. सोबत वनभोजनाच्या दिवशी सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे, या सर्व वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी क्लबचे सेक्रेटरी लॉ. तेजेंद्रसिंह चौहान हे स्वतः घेणार आहे.
![]() |
जाहिरात |
![]() |
जाहिरात |
Post a Comment