लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे लहान मुलांना कॅन्सर बाबत जागृती अभियान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीद्वारे एक अनोखी पहलच्या माध्यमातून दि.७ जुलै रविवार रोजी सकाळी १०.१५ वाजता लहान मुलांना कॅन्सर पासूनवेळीच संरक्षण मिळावे याबाबत जागृती अभियानाची सुरूवात करण्यात येणारआहे. सदर कॅन्सर जागृती अभियान आदर्श ज्ञानपीठ इंग्लीश शाळा घाटपुरी नाका, लक्ष्मी मंदीराच्या जवळ खामगांव येथे ठिक सकाळी १०.१५ ते ११.३०वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी पिनलावुन आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन लॉयन्स क्लब संस्कृती तर्फे करण्यात आले आहे. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.
Post a Comment