लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे लहान मुलांना कॅन्सर बाबत जागृती अभियान शिबीर संपन्न
खामगाव - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे ७ जुलै रोजी स्थानिक आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलमध्ये एका अनोख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या एकदिवशीय शिबीरात बालपणातील कर्करोगाची समस्या, बालपणातील कर्करोगाचा प्रतिबंध व उपचार या विषयावर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लॉ. डॉ. सोनल टिबडेवाल आणि रेकी ग्रॅण्ड मास्टर लॉ. गजानन सावकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुले, त्यांचे पालक व इतर लोकही उपस्थित होते. आता असे एकदिवशीय मोफत शिबीर प्रत्येक शाळेत आयोजीत करण्यात येणार असल्याचे लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव तर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, यांच्यासह लॉयन्स क्लब संस्कृतीचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.
Post a Comment