प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरेखा यांचे वारंवार होत आहे नुकसान
पावसामुळे पिकांचे झाले नुकसान आता तरी प्रशासन लक्ष देईल काय?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- वेळोवेळी तक्रारी वजा निवेदन देऊनही प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे हतबल झालेल्या सुरेखा यांनी अखेर पत्रकाराजवळ आपले दुखणे व्यक्त केले.
प्राप्त माहितीनुसार खामगाव येथील सीतादेवी सुरेखा यांचे शिरसगाव देशमुख (जनता नगर)येथे शेती आहे. या शेतीत दरवर्षी ते पीक घेत असतात मात्र नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आता या नाल्याचे पाणी सरळ शेतीमध्ये शीरते. गेल्या दोन दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसाचे पाणी देखील शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खामगाव चिखली मार्गावरील शिरजगाव देशमुख(जनता नगर) जवळ असलेल्या पूला जवळून देखील एका प्लॉट धारकाने पाणी अनधिकृत वाढविले आहे. त्यामुळे आलेल्या पुराचे पाणी सरळ अतिक्रमित वस्तीत व सूरेखा यांच्या शेतात शिरले. परिणामी सुरेखा यांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले. ग्रामपंचायत प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सुरेखा यांनी केली आहे.
Post a Comment