खामगाव पोलिसांचे आरोग्य धोक्यात!
लक्ष देणार कोण? लोकप्रतिनिधी, पालिका की पीडब्ल्यूडी?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक शहर पोलीस स्टेशन जवळील पोलीस वसाहतीत अनेक समस्या असून इमारती जवळ असलेल्या डबक्यामुळे पोलीस व त्यांच्या परिवाराचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष कोण देणार लोकप्रतिनिधी पालिका की पीडब्ल्यूडी ?असा सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांसाठी दिवस आणि रात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहती मधील तीन इमारतींपैकी इमारत क्रमांक एक व दोन जवळ घाण पाणी तुंबले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता या पाण्याने दबक्याचे स्वरूप घेतले आहे.
डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधी देखील पसरत आहे .त्यामुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येते. गेल्या अनेक महिन्यापासून ही समस्या निर्माण झाली असून आता पावसाळ्यात या पाण्यात आणखी भर पडली आहे त्यामुळे पाण्याचा उपसा होण गरजेचे आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे व समस्यांचे निरसन करावे अशी अपेक्षा वसाहत मधील रहिवाशांचे आहेत.
Post a Comment