विविध उपक्रमाद्वारे सुप्रिया ताई सुळे यांचा खामगावात वाढदिवस साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटा च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्कृष्ट संसद पटू आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी अल्पसंख्यांक महिला आघाडी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आगळावेगळा उपक्रम राबवून आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा होत असतो. यावर्षी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक महिला आघाडी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्प संख्यांक महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव राहिना परवीन एस खान यांच्या नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धोंडीरामजी खंडारे खामगाव तालुका कार्याध्यक्ष संजयजी बगाडे व अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष शेख सलीम शेख फरीद माजी नगरसेवक संभाजीराव टाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सहशासकीय रुग्णालय खामगाव येथे ३० जून रोजी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी चोळी मिठाई पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Post a Comment