पिकविम्याचा लाभ सर्वाधिक : २० कोटी मंजूर
डीवरे यांच्या पुढाकाराने वएड.निलेश मानकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाला न्याय!
नांदुरा जनोपचार न्यूज::खरीप हंगाम २०२३-२४ साठी नांदुरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या पिकाचा विमा उत्तरविला होता. मागील खरिप हंगामात नांदुरा तालुक्यात जवळपास सर्वच महसुली मंडळात एक दोन वेळेस अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तर काही भागात पावसाचा सततचा खंड पीक नुकसानीसाठी कारणीभूत ठरला होता. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळणे कपनीने जाचक अटीतून शेतकऱ्यांना विम्यापासुन वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले होते. यासाठी शेतकऱ्याच्या वतीने सदर पीक विमा कंपनी विरोधात शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष डीवरे यांनी पुढाकार घेत अॅड. निलेश मानकर यांचे वतीने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे पीक विम्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला आहे.
नांदुरा तालुक्यातील २० हजार ४९२ शेतकऱ्यांसाठी १९ कोटी ७४ लाख रुपये पिकविम्यासाठी मंजूर झाले असून जिल्ह्यात हा आकडा सर्वाधिक आहे. प्रधानमंत्री पीक योजना अंतर्गत खरीप हंगाम २३-२४ साठी बुलडाणा जिल्ह्यातील ७ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी आपआपल्या वेगवेगळ्या पिकाचा विमा उतरविला असता अस्मानी व सुलतानी संकटात दरवर्षी सापडणाऱ्या बळीराजाला या खरीप हंगामात खूप मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यासाठी त्यांनी विमा कंपनीकडे रितसर तक्रारी सुद्धा दाखल केल्यावरही अनेकांची नावे त्यातून सुटली होती. नांदुरा तालुक्यात पण तसाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. त्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डिवरे यांनी पुढाकार घेऊन १२ एप्रिल रोजी अॅड. निलेश मानकर यांच्या वतीने १२४० शेतकऱ्याच्या वतीने रिट पीटिशन क्र. ७४०/२४ दाखल केली होती. ही पीटिशन दाखल केल्यामुळे नांदुरा तालुक्यातील २० हजार ४९२ शेतकऱ्यांना १९ कोटी ७४ लाख रुपये पीक विमा मिळणार असून राज्य सरकारने जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानुसार जी आर निर्गमित करून सदर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पीटिशनमुळे नांदुरा तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
Post a Comment