लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचा पदग्रहण समारंभ संपन्न

खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क :- लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे पदग्रहण समारंभ शनिवार दि. २२ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजता श्रीहरी लॉन्स, खामगांव येथे संपन्न झाला. यावेळी सन २०२४-२५ करीता अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न झाला. यावेळी इंस्टालीग ऑफीसर व चिफ गेस्ट पास्ट मल्टीपल काऊसिंग चेअरपर्सन व एलसीआयएफ कोऑर्डीनेटर एमडी ३२३४ लॉ. दिलीप मोदी, प्रमुख अतिथी म्हणून आमदार आकाश फुंडकर यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी रिजन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मंचावर आमदार आकाश फुंडकर, इंस्टालीग ऑफीसर व चिफ गेस्ट पास्ट मल्टीपल काऊसिंग चेअरपर्सन व एलसीआयएफ कोऑर्डीनेटर एमडी ३२३४ लॉ. दिलीप मोदी, लॉ. सुरज एम. अग्रवाल, लॉ. सुरज बी. अग्रवाल, लॉ. संजय उमरकर, प्रेसीडेन्ट लॉ. शैलेश शर्मा, ट्रेझरर लॉ. गजानन सावकार, सेक्रेटरी लॉ. तेजेंद्रसिंग चौहान, पास्ट प्रेसीडेन्ट लॉ. डॉ. राजपुत, पास्ट सेक्रेटरी लॉ. राजेंद्र थाडा, पास्ट ट्रेझरर लॉ. विजय शर्मा आदींची उपस्थिती होती.

कॅबीनेट ऑफीसर एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल, ग्रवाल, रिजन चेअरपर्सन लॉ. उज्वल गोयनका, झोनचेअरपर्सन एमजेएफ लॉ. नरेश चोपडा, एमजेएफ पीआरओ लॉ. राजकुमार गोयनका, एमजेएफ लॉ. विरेंद्शहा, लॉ. अशोक गोयनका, एमजेएफ लॉ. सुरज अग्रवाल, चार्टर्ड प्रेसीडेन्ट लॉ. विजय जांगीड, एमजेएफ अभय अग्रवाल, लॉ. राजेंद्र थाडा इत्यादी कॅबीनेट ऑफीसरचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार आकाश फुंडकर, लॉ. दिलीप मोदी, लॉ. सुरज एम. अग्रवाल, लॉ. सुरज बी. अग्रवाल, लॉ. संजय उमरकर, प्रेसीडेन्ट लॉ. शैलेश शर्मा, ट्रेझरर लॉ. गजानन सावकार, सेक्रेटरी लॉ. तेजेंद्रसिंग चौहान, पास्ट प्रेसीडेन्ट लॉ. डॉ. राजपुत, पास्ट सेक्रेटरी लॉ. राजेंद्र थाडा, पास्ट ट्रेझरर लॉ. विजय शर्मा आदींनी मार्गदर्शनपर भाषण केले. लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती यांच्या कार्याबद्दल लॉ. दिलीप मोदी व आमदार आकाश फुंडकर यांनी अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण संचालक मंडळाचा शपथविधी पार पडले. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार व लॉयन्स पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


यावेळी कार्यक्रमाचे संचालन लॉ. सपना मुणोत, लॉ. सोनल टिबडेवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन लॉ. राजेंद्र थाडा यांनी केले. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post