तुम्ही हाक द्या... आम्ही साथ देऊ..
शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी भाजयुमो व विद्यार्थी आघाडी करणार दूर!
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया व शासकीय कागदपत्रांसाठी अडचणी दूर करण्यासाठी भाजयुमो व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने तुम्ही हाक.. द्या आणि साथ देऊ ..या विशेष अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.
खामगाव मतदार संघातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील मोठ्या प्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी खामगाव शहरात येतात. अनेक महाविद्यालयात त्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात तसेच प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयात अनेक चकरा मारावे लागतात. विद्यार्थ्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तुम्ही हाक द्या.. आम्ही साथ देऊ.. हे विशेष अभियान विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे. खामगाव मतदार संघाचे लाडके आ. अँड आकाश फुंडकर यांचे संकल्पनेतून व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान राबविले जात आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शहरातील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट प्रवेशासाठी आशिष सुरेका 8446661103 व राज पाटील 9881466565, जी एस कॉलेज प्रवेशासाठी शुभम देशमुख 9096965570 व प्रतीक मुंडे पाटील 9022394066, नॅशनल हायस्कूल साठी राहुल जाधव 9309993045 व पवन ठाकूर 9970206038, शासकीय तंत्रनिकेतन व ITI साठी योगेश आळशी 8805202136 व प्रतिक नांदोकार 7038423861, जे .वी .मेहता महाविद्यालय साठी हितेश पदमगिरीवार 9503968264 व पवन डीक्कर 9766667954, महिला महाविद्यालयासाठी सौ. भाग्यश्रीताई मानकर 9373469692 व कु.साक्षी भोजने 9373469692 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शासकीय कागदपत्राची अडचणी आल्यास पांडुरंग काळे 7875226226, राहुल घाडगे 8208076697, रोहन जयस्वाल 9822694440 व शुभम सातपुते 9561780314 यांच्याशी तर इतर कोणत्याही माहितीसाठी व समस्यांसाठी या अभियानाचे संयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा 9850368354 व खामगाव मतदार संघाचे युवा मोर्चाचे संयोजक पवन गरड 9767923698 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment