दिसली भिंत की लावा टपरी..
खामगावच्या सौंदर्यकरणाचा बट्टा बोळ: पालिका प्रशासन करते तरी काय?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शहराच्या सौंदर्य करण्यासाठी नगरसेवकापासून ते आमदारांपर्यंत प्रयत्न करत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमण धारकांनी अनधिकृत लावलेल्या टपऱ्यांमुळे या सौंदर्यकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिसली भिंतकी लावा टपरी असा उपक्रम खामगाव शहरात अवैध टपरी मालकांकडून सुरू असल्याचे दिसते. खामगाव शहरातील प्रमुख व नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ह्या टपऱ्या रातोरात लावण्यात आल्या मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आता बहुतांश ठिकाणी अवैध टपऱ्या लावण्यात येत असल्याचे दिसून येते. स्थानिक सहा नंबर शाळेजवळ ,सामान्य रुग्णालयाजवळ, कॉटन मार्केटच्या टीएमसी प्रकल्प जवळ, जलब रोड अशा अनेक भागात अतिक्रम टपऱ्या दिसून येतात. प्रशासनाने त्यांच्या बेरोजगारीवर उपाययोजना करत किंबहुना त्यांना इतरत्र लीज वर जागा उपलब्ध करून देऊन सदर टपऱ्या उचलण्या द्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
![]() |
जाहिरात |
Post a Comment