लॉ सुरज एम. अग्रवाल यांची रिजन चेअरपर्सन वर्ष 24/25 साठी लॉयन्स डिस्टिक तर्फे नियुक्ती


लॉयनिझम क्षेत्रामध्ये अत्यंत कार्यशील म्हणून यांची समाजसेवेच्या कार्यमध्ये ओळख आहे असे लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती चे ज्येष्ठ सदस्य एम जे एफ लॉ सुरज मधुसूदन अग्रवाल यांची रीजन चेअर पर्सन म्हणून नियुक्ती, नवनियुक्त डिस्टिक गव्हर्नर लॉयन गिरीश सिसोदिया यांनी एका पत्राद्वारे केली. यांच्या रीजनमध्ये तीन झोन देण्यात आले असून त्या झोनची जबाबदारी झोन चेअर पर्सन म्हणून झोन क्रमांक एक साठी लॉयन उज्वल गोएनका झोन क्रमांक दोन साठी लॉयन सौ अनिता उपाध्याय अकोला, झोन क्रमांक तीन साठी लॉयन सत्यपाल बासानी अकोला यांच्या नियुक्ती करण्यात आल्या

जाहिरात 
 त्यांच्याकडे प्रत्येकी चार क्लब ची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच या सर्वांसोबत कोऑर्डिनेट करण्यासाठी अत्यंत जबाबदार कर्तुत्ववान तसेच ज्यांनी लॉयन्स क्लब संस्कृतीचा झेंडा साता समुद्रा पार फडकविला असे माजी अध्यक्ष एम जे एफ लॉ प्रा. वीरेंद्र शहा हे रिजन सेक्रेटरी म्हणून यांना सुरज एम अग्रवाल यांनी जबाबदारी दिली. या सर्व नवीन टीमला डिस्टिक मधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशी माहिती क्लब पी आर ओ लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.



Post a Comment

Previous Post Next Post