बैलाला क्रूरपणे फरफटत नेणाऱ्या तिघांवर खामगावात गुन्हा दाखल
एकनिष्ठाचे कर्तव्यदक्ष सुरज यादव यांनी केली बैलाची सुटका
खामगाय- शेगाव रोडवरील लांडे फाट्यानजीक एका बैलाला दोराने बांधुन क्रूरपणे फरफटत नेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनिष्ठा फाऊंडेशनचे सुरज यादव यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला असून यादव यांनी येथून बैलाची सुटका केली आहे. सुरज यादव हे काल सकाळी मित्रगोकूल बुदेले यांच्यासह दुचाकीने शेगावकडे जात होते.
![]() |
जाहिरात |
दरम्यान त्यांना जयपूर लांडे फाट्यानजीक तीन लोक एका बैलाला दोराने बांधुन क्रूरपणे फरफटत नेत असल्याचे दिसून आले. यावेळी यादव यांनी त्यांना हे कृत्य करण्यापासून थांबवत पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलाविले. यावरून शहर पोलीस जयपूर लांडे फाटयाबर दाखल झाले. पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची पाहणी केली, यावेळी जखमी झालेल्या बैलाला दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर सदर बैल घाटपुरी येथील गौरक्षणमध्ये नेण्यात आला. याप्रकरणी सुरज यादव यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बैलाला क्रूरपणे वागणूक देणाऱ्या शेख कासम ५५) रा. जळगाव जामोद व इतर दोघे अशा तिघांविरुध्द कलम ११(१), (फ) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० व कलम ९ महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
![]() |
जाहिरात |
Post a Comment