श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार जलकुंड पिंपळोद चे सामूहिक पारायण सोहळा अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न
900 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री परमहंस परशराम महाराजांच्या सामूहिक परायण सोहळ्याची श्री अंबादेवी संस्थान अमरावती कीर्तन सभागृहात 1 जून रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सकाळी 8.30 वाजता परमहंस परशराम महाराज महिमा ग्रंथाचे पारायण सुरू झाले. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या आठवडाभरापासून तयारी सुरू होती. त्यात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात 900-1000 भाविक भक्तांनी सहभागी दर्शविली . श्रीक्षेत्र शेगाव येथे पुढील सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जयंत (बाप्पू) वानखडे यांनी दिली. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर धार्मिकतेने भरून गेला.
त्यासाठी पंधरवड्यापासून सुरू झालेल्या नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 124 वर्षांपूर्वी 14 मे 1900 रोजी भातकुली तालुक्यातील जैतापूर (गुरव) गावात भीमाबाई बळीराम (गुरव) वडनेरकर यांच्या पोटी परमहंस परशराम महाराजांचा जन्म झाला. सकाळी ८ वाजता महाराजांच्या ग्रंथाची दिंडी श्री निळकंठेश्वर संस्थान निळकंठ चौक बुधवारा अमरावती येथून काढण्यात आली. 8.30 वाजता सामूहिक पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. पारायण व आरतीनंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गावाबाहेरून आलेल्या भाविकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही आयोजक सेवाधारी परिवार कडून करण्यात आली होती. भाविक भक्तांमध्ये पारायणाचा प्रचंड उत्साह होता.
बसण्यासाठी ड्रेसकोड ठरलेला होता. पुरुष पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि स्त्रिया लाल किंवा पिवळी साडी. या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य सेवाधारी जयंत सुरेश वानखडे व सेवाधारी परिवार जलकुंड पिंपळोद यांनी श्री परमहंस परशराम महाराज सामूहिक पारायण सोहळा यशस्वितेसाठी हातभार व सहभाग लावलेल्या सर्वांचे आभार मानले.
Post a Comment