लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवची कार्यकारणी 2024-25  

अध्यक्ष लॉ.शैलेश शर्मा, सचिव लॉ.तेजेंद्रसिंग चौहान, कोषाध्यक्ष गजानन सावकर 

खामगाव   -  लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव सन 2024-25 ची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी लॉ.शैलेश शर्मा, सचिव लॉ.तेजेंद्रसिंग चौहान तर कोषाध्यक्ष पदासाठी लॉ.गजानन सावकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 


लॉयन्स क्लब संस्कृती सन 2020 पासून विविध माध्यमातुन आपली सेवा देत आहे.    दरवर्षी नविन कार्यकारणी गठीत करण्यात येते.  यावर्षी सुध्दा लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवची कार्यकारणी दि. 24 मे रोजी अग्रवाल क्रॉकरीज येथे संपन्न झालेल्या सभेत गठीत करण्यात आली. या सभेला एमजेएफ सन 2023-24 चे अध्यक्ष लॉ.डॉ.भगतसिंग राजपुत, सचिव लॉ.राजेंद्र थाडा, कोषाध्यक्ष विजय जांगीड, लॉ.नरेश चोपडा, लॉ.सुरज बी. अग्रवाल, लॉ.सुरज एम.अग्रवाल, लॉ.अभय अग्रवाल, लॉ.अजय छतवाणी, लॉ.अशोक गोयनका, लॉ.उज्वल गोयनका, लॉ.सुशिल मंत्री, लॉ.सतिष अग्रवाल, लॉ.शैलेश शर्मा, लॉ.निशीकांत कानुनगो, लॉ.तेजेंद्रसिंग चौहान, लॉ.गजानन सावकार, लॉ.राजकुमार गोयनका, लॉ.गोविंद चुडीवाले, लॉ.अजय अग्रवाल आदी लॉयन्स सदस्य उपस्थित होते.   

जाहिरात


या सभेमध्ये सन 2024-25  साठी अध्यक्षपदी लॉ.शैलेश शर्मा, सचिव लॉ.तेजेंद्रसिंग चौहान तर कोषाध्यक्ष पदासाठी लॉ.गजानन सावकार यांची सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरात देवुन त्यांची निवड करण्यात आली आहे. वरील माहिती लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे प्रसिध्दी प्रमुख लॉ.राजकुमार गोयनका यांनी दिली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post