UPSC मध्ये IAS झालेले डॉ श्रीकृष्ण सुशील यांचा भव्य सत्कार 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित खामगाव व शेगाव तालुका च्यावतीने UPSC मध्ये IAS झालेल्या डॉ श्रीकृष्ण सुशील यांचा भव्य सत्कार करण्यात आला .

जळगाव जामोदयेथील श्रीरामभाऊ सुशीर यांचे चिरंजीव डॉ. श्रीकृष्ण देशातील सर्वोच्च मुलकी सेवेतील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत 155 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले. बुलडाणा जिल्ह्यातील धनगर समाजामध्ये पहिला IAS होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. डॉ श्रीकृष्ण यांचे वडील एक सूतगिरणी कामगार म्हणुन आपले गाव सावळी येथून जळगावला आले. सूतगिरणी बंद झाल्यावर त्यांनी गावी परत न जाता दुग्ध व्यवसाय करून आपल्या मुलांना शिक्षण दिले एक मुलगी शिक्षिका, दोन मुली डॉक्टर व मुलगा श्रीकृष्ण यांनी सुद्धा MBBS ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली व चिकाटीने व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ते आज IAS झाले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश टिकार  तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष रमेश जुमळे ,  जेष्ठ अशोक मानकर  होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष  विनोद खवले यांनी केले . यावेळी माजी नगरसेविका सौ भाग्यश्रीताई मानकर ,सुश्री उर्मीलाताई ठाकरे , शिवश्री शुभांगी घिवे यांनी शुभेच्छा व अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. साकारमूर्ती डॉ श्रीकृष्ण सुशिर यांनी त्यांचा UPSC चा संघर्ष व उपस्थितांना स्पर्धा परिक्षेबद्दल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचलन श्री पाटेखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अनंत वानखडे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेविका सौ भाग्यश्रीताई मानकर


Post a Comment

Previous Post Next Post