दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कार भारती, टिळक स्मारक महिला मंडळ, विदर्भ साहित्य संघ, दस्तुर रतनजी ग्रंथालय, सु. रा. मोहता महिला महाविद्यालय, गो. से. महाविद्यालय, खामगाव अर्बन बँक, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "पाडवा पहाट" या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे व नगर संघचालक प्रह्लाद निमकंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर नांदी पासून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमाच्या अंतरंगात महाराष्ट्राची संपूर्ण लोकधारा सादर करण्यात आली. यामध्ये भूपाळी, जात्यावरच्या ओव्या, दळण कांडण, वासुदेव या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.यानंतर गणेश वंदना , कोळी नृत्य, सादर करण्यात आले. महाराष्ट्राची ओळख ही संतभूमी म्हणून आहे त्यामुळे वारकरी सांप्रदायातील संतांचे अभंग सदृश्य सादर केले. धनगर गीताने विशेष लक्ष वेधले. महाराष्ट्राची आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराजांच्या कीर्तीच्या पोवाड्याने स्फुरण चढले. अंबाबाई चा गोंधळ व जोगवा , दिंडी आणि भारुड यांनी भक्तिमय वातावरणात नेले. बया दार उघड या सादरीकरणाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली. महाराष्ट्र गौरव गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन , प्रास्ताविक व आभार प्रदर्शन टि. स्मा. च्या अध्यक्षा प्रा. सौ. विद्याताई कावडकर यांनी केले. सादरीकरण करणाऱ्यांमध्ये डॉ. प्राजक्ता हसबनीस, माधुरी हसबनीस, ज्योती पाटील, मंजिरी पाटील, शोभा शिंगटे, कविता शिंगटे, अनुपमा भडंग, स्मिता निंबाळकर, विद्या बुरंगी, वंदना गावंडे, वर्षा सातव, अनुजा चितळे, विद्याताई देशमुख, मीना देशमुख, जयश्री तायडे, सुजाता वकील, शुभाली झालटे, अदिती गोडबोले, रंजना मुळे, अचला गद्रे, सीमा देशमुख, रेवा देशपांडे, वेदांत कस्तुरे, सई कुलकर्णी, सौम्या कुलकर्णी, पलक इटमंलु, भावना परदेशी, श्रुती आटोळे , किरण रेठेकर, शेखर कुलकर्णी,शुभम ईटणारे ,गणेश चांदूरकर ,आकाश ताकवाले यांचा सहभाग होता. कलाकारांना डॉ. अभय गद्रे, डॉ. संजीव भोपळे, मोहन हसबनीस, मधुकर आटोळे, प्रथमेश मारोडे, जय पवार यांनी वाद्यांवर साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ खेर्डे, कैलास गुरव, बगाडे जी, विजय शिंदे, भारती शिंदे आणि अनेकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला दै. देशोन्नती चे राजेश राजोरे तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment