अबकी बार 400 पार" साठी महिलाही सरसावल्या...खा.प्रतापराव जाधव यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला सुरूवात

खामगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या आपकी बार 400पार साठी खामगावात आता महिलाही प्रचार कार्यात जूटले आहेत. शिवसेना -  भाजप -  राष्ट्रवादी - रिपाई (आठवले) - रासप महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ खामगाव शहरात 10 एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक 1 मधील अमृत नगर भागातील जलंब रोडवरील महादेव मंदिर येथून करण्यात आला. 

सकाळी 10 वाजता सर्वप्रथम महादेव मंदिरात पुजा अर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र देशमुख यांच्याहस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली. यानंतर प्रभाग 1 मधून डोअर टू डोअर जावून मतदारांना महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून देशाचा सर्वांगिण विकास, सक्षम बलशाली भारत बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी यांनी 10 वर्षात केलेली कामे, विविध योजना, धाडसी निर्णयांबाबत मतदारांसोबत चर्चा केली.

 वार्ड क्र.1 पासून महायुतीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून रोज प्रत्येक वार्डात डोअर टू डोअर प्रचार फेऱ्या काढल्या जाणार आहेत. यावेळी मा. नगरसेवक विलासबापू देशमुख, मा.नगरसेविका सौ.भाग्यश्रीताई मानकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post