सेवार्थ विद्यार्थी तर्फे खामगाव नगरा मध्ये जल मंदिराचे उद्घाटन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-सामाजिक क्षेत्रात सेवार्थ विद्यार्थी सेवेच्या माध्यमातून खामगाव नगरा मध्ये जल मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. समाजामध्ये चांगला विद्यार्थी व समजा प्रति सेवा भाव निर्माण व्हावी तसेच उन्हाच्या प्रभावामुळे तहान भागवण्यासाठी जल मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी माननीय डॉ.श्री.पांडुरंग हटकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उद्घाटना प्रसंगीअभिषेक भेंडे विदर्भ प्रांत सेवार्थ विद्यार्थी संयोजक,गो.से.महा.प्राचार्य डॉ.धनंजय तळवणकर,औ. प्र.सं. उपप्राचार्य जितेंद्र काळे, श्री.विनोद डीडवानिया संचालक सुपर शॉपी, प्रा.श्री. संजय वराडे,महादेवराव भोजने पूर्व जिल्हा संघचालक खामगाव, प्रा.हनुमंत भोसले गो.से. महा.गणेश घोराले अभाविप जिल्हा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.अभिषेक भेंडे विदर्भ प्रांत सेवार्थ विद्यार्थी संयोजक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केली तर आभार प्रदर्शन ऋषिकेश वाघमारे यांनी केले तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment