शिरजगाव देशमुख येथील बेपत्ता युवकाचे प्रेत आढळले जनुना तलावात

खामगाव जनोपचार :- मामेभावासह तिघांनी केलेल्या मारहाणीनंतर अपमानास्पद वाटल्याने रागाच्या भरत घरून निघून गेलेल्या 25 वर्षीय युवकाचे प्रेत आज सकाळी जणूना करावा आढळले.

सुनील उर्फ बबलू वसंता इंगळे राहणार शिरसगाव देशमुख असे  मृतकाचे नाव आहे. १ एप्रिल पासून तो बेपत्ता असल्याची तक्रार आशाबाई वसंत इंगळे यांनी ग्रामीण पोस्टेत दिली होती. या तक्रारीत त्यांनी नमूद केले होते की 31 मार्च रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मृतक सुनील इंगळे याला त्याचा मामे भाऊ कैलास खंडेराव यांच्यासह तीन महिलांनी मारहाण केली. त्यामुळे सुनील इंगळे याला अपमान वाटला आणि तो रागाच्या भरात घरून निघून गेला. आज सुनील इंगळे यांचा मृतदेह जनुना तलावाच्या पाण्यावर तरंगताना मिळून आला. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन गृहात रवाना केला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post