अवैध धंदे त्वरित बंद करावे - हिंदुराष्ट्र सेनेची मागणी उप
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शहरासह तालुक्यात बऱ्याच वर्षांपासून बिनधास्तपणे अवैध धंदे जसे वारली मटका, सट्टा, गुटखा विक्री, जुगार क्लब, गांजा विक्री इत्यादी अवैध धंदे सहजपणे सुरू आहे ज्यामुळे शाळकरी विद्यार्थी, तरुण युवक व असंख्य गोर गरीब मजुरांचे भविष्याची राख रांगोळी होऊन संसार उध्वस्त होत आहे. सदर अवैध धंदे चालविणाऱ्या लोकांवर राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याने स्थानिक पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे
अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक याना देण्यात आले . यावेळी हिंदुराष्ट्र सेना, युवा जिल्हाध्यक्ष, रवी भाऊ माळवंदे, खामगांव शहर अध्यक्ष सागर बेटवाल , सुरज भैय्या यादव व इतर पदाधिकाऱ्यांद्वारे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,शहरात मोठ्या संख्येने गोवंश चोरी व गोवंशांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू असून ही कार्यवाही होत नाही. त्यामुळे निवेदनाची लवकरात लवकर गंभीर दखल घेऊन अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही हिंदुराष्ट्र सेना द्वारे करण्यात आले आहे.
Post a Comment