ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक सर यांचा सन्मान
खामगाव :- तेलंग सर कोचिंग क्लासेसच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता ब्राह्मण समाज सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे रहिवाशी ब्रिजमोहन लाल खंडेलवाल सर होते. या प्रसंगी मोहम्मद फारुक सर , सागर दादा फुंडकर, तेजेंद्रसिंह चव्हाण, देवदत्त गोखले, डॉ. काळे सर, महेश गावंडे, एल.एन.तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
नागपूरचे रहिवासी ब्रिज मोहनलाल खंडेलवाल यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रात सलग 42 वर्षे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रा.मोहम्मद फारुक सर यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. .या प्रसंगी ब्रिजमोहनलाल खंडेलवाल व सत्कारमूर्ती मोहम्मद फारुक सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यां गौरव करण्यात आला या मध्ये अमित बर्डे, राधिका मुळे, मेघा उमाळे , , साक्षी वारुळकर , कार्तिक गावंडे, मृणाल देशमुख, शुभम तायडे, अनघा पवार, आदीचा समावेश होता यावेळी मोहम्मद फारूक सरांनी एल.एन.तेलंग सरा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.विधीके देशमुख, गौरी मोहिते, हर्षल देवकर यांनी सामूहिक संचालन केले.अनिल तेलंग सर यानी सत्कार मूर्ति , प्रमुख पाहुण्याचे तसेच मान्यवरांचे व उपस्थित विद्यार्थी व पलकाचे आभार व्यक्त केले
Post a Comment