शारीरिक शिक्षकांची भरती होणार ..
राज्य सचिव डॉ. उपर्वट
(शारीरिक शिक्षण महामंडळाच्या मागणीला यश)
खामगांव :-शालेय स्तरावर शिक्षक निर्धारण करण्याकरिता असलेल्या संचय मान्यतेचे निकष २०१४ साली शासनाद्वारे बदलविण्यात आले होते. ते बदल अन्यायकारक असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, अमरावती यांचे वतीने शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला. या महामंडळाच्या मागणीला यश आले असून त्यामुळे शारीरिक शिक्षण पदवीधरकांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने १५ मार्च रोजी एक शासन निर्णय काढला असून बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शारीरिक शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येणार आहेत. शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्त करताना पूर्ण वेळ शिक्षकांचा किमान ५०% शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार आवश्यक राहील. कार्यभार गणना करताना शाळेतील ई.६ पासूनच्या पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील. नियुक्त करण्यात येणारा शारीरिक शिक्षक ई.९ व ई.१० या गटातील असेल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. आता नवीन शासन निर्णयानुसार इयत्ता सहावी ते दहावीचा कार्यभार धरून शारीरिक शिक्षकांची पदभरती होणार आहे असे महामंडळाचे राज्य सचिव डॉ. पी. आर. उपरवट यांनी कळविले आहे. या मागणीसाठी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुण खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पुरुषोत्तम उपरवट, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगरचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर सचिव विश्वनाथ पाटोळे, शारीरिक शिक्षण समन्वय समितीचे शिवदत्त ढवळे ज्ञानेश काळे, युवा शारीरिक शिक्षक संघटनेचे तायप्पा शेंडगे यांचे सोबत डॉ. आनंद पवार, राजेश जाधव, प्रीतम टेकाळे लक्ष्मण बेल्हाळे, घनश्याम जाधव यांचेसह अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment