शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-
खमगाव संपूर्ण देशभरात विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दिनांक १९/०२/२४ रोजी अत्यंत थाटामाटात साजरा होत आहे. त्याच अनुषंगाने ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण केले. अशा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र मंडळाच्या वतीने दिनांक १९/०२/२४ रोजीका सळी ठीक ८:०० वाजता श्री शिव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव पालखी सोहळ्यात आपण सर्व शिवभक्त सहपरिवार उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद व प्रोत्साहन वाढवाल हीच अपेक्षा. हा शिव पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथुन श्री दत्त मंदिर ते श्री फाटे यांच्या घरापासून ते श्री सागर बेटवाल यांच्या समोरून ते श्री सचिन काटकर यांच्या घरापासून ते श्री अशोकराव ढंगे यांच्या घरापासून श्री डॉक्टर छाजेड यांच्या दवाखान्यापासून निर्मल टर्निंग सती फैल प्रवेशद्वार हनुमान मंदिर बरडे प्लाॅट चौफुली दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे समारोप करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शिवभक्तांनी आपल्या परिवारासह उपस्थित रहावे, असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र परिवार खामगाव यांनी केले आहे.
Post a Comment