शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे 20 फेब्रुवारी पासून करणार नगरपरिषद समोर आमरण उपोषण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: खामगांव शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी सर्व फेरीवाल्यांना सोबत घेऊन मागील पंधरा दिवसांमध्ये तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही मागण्यांची दखल आजपर्यंत घेतल्या गेली नाही. 20 फेब्रुवारी पर्यंत उपरोक्त निवेदनामध्ये केलेल्या मागण्यांची दखल घेतल्या गेली नाही तर 20 फेब्रुवारीपासून नगरपरिषद समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी चेतावणी गणेश भाऊ चौकशी यांनी शुक्रवार रोजी उपमुख्य अधिकारी यांच्यामार्फत मुख्याधिकारी शेळके यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिली आहे.
निवेदनामध्ये नमूद केले आहे की,खामगाव नगर परिषद येथील फेरीवाल्यांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे शहराची मुख्य बाजारपेठ ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सुमारे तीनशे ते चारशे फेरीवाल्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्व नगरपालिकेत दोन ते तीन वेळा मोर्चा नेलाअसता माननीय मुख्य अधिकारी हे सतत गैरहजर होते त्यामुळे सदर मोर्चा हा आपल्या मागण्यांसाठी माननीय उपविभागीयअधिकारी यांची दोन वेळा भेट घेतली असता समस्या निकाली निघाली नाही त्यामुळे फेरीवाले व फेरीवाल्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्दिष्टाने माननीय जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशे यानी अखेर शांततेच्या दृष्टीने गांधीगिरीच्या मार्गाने नगरपरिषद समोर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे नमूद दिनांक 16 2 2024 वार शुक्रवार रोजी दिलेल्या निवेदनात केले आहे. निवेदनाची प्रत शहर पोलीस ठाणेदार, उपविभागीय अधिकारी यांना पण देण्यात आली आहे.
------------------------------------------------
Post a Comment