शिवसेना महिला आघाडी कडून हळदी कुंकु
खामगाव शिवसेना महिला आघाडी कडून महिला भगिनींसाठी हलदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. सर्वप्रथम हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला मानवंदना करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरुवात करन्यात आली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंदाताई बडे , श्रुती ताई पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा कार्यक्रम टिळक मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला .विशेष म्हणजे कार्यक्रमाला विधवा महिलांना संक्रांतीचे वान देऊन मान सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हाप्रमुख शैलजाताई ठाकरे, तालुकाप्रमुख श्रुतीताई पतंगे, शहर प्रमुख ज्योतीताई तारापुरे, उप शहर प्रमुख बबीता ताई हटेल ,तालुका प्रमुख उषाताई राऊत, उपतालुकाप्रमुख सुरेखाताई चिलवन ,शाखाप्रमुख नंदाताई दुबे, शाखाप्रमुख गंगा भट्टड, तारापूरे ताई उषाताई पतंगे खारवे ताई, सुरळकर ताई, रंगदळे ताई ,नीता तेलकर मिरगे ताई, टेंभे ताई हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थित होत्या.
Post a Comment