अनेक महिन्यानंतर खामगाव कृउबासला मिळाले सचिव
गजानन आमले शासकीय सचिव म्हणून रुजू
खामगाव-अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला कायमस्वरुपी सचिव मिळाले आहेत. गजानन जगदेव आमले यांची खामगाव कृउबासला शासकीय सचिवपदी नेमणूक करण्यात आली असून ते नुकतेच रुजू झाले आहेत. अनेक महिन्यांपासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रभारी सचिवांच्या भरवशावर सुरु होता.
यामुळे याठिकाणी सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरु असल्याचा आरोप होत होता. दरम्यान विभागीय सहनिबंधक यांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय सचिव म्हणून मोताळा येथील सहाय्यक निबंधक गजानन जगदेव आमले यांची नेमणूक केली आहे. आमले हे नुकतेच खामगाव कृउबासला रुजू झाले आहेत. आमले यांच्याकडून बाजार समितीमध्ये पारदर्शक कारभार करुन शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे
![]() |
कृ उ बा स चे नवनियुक्त शासकीय सचिव श्री आमले साहेबांचे वर्गमित्र यशवंत कोचिंग क्लास खामगाव ते संचालक श्री अतुल इंगळे सर तसेच श्री प्रमोद भोजने, श्री नानकसिंग जाट यांनी स्वागत केले |
.
Post a Comment