युवा हिन्दू प्रतिष्ठाण तर्फे आ.जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध
प्रभू श्रीरामचंद्रांवर केलेल्या बेताल वक्तव्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी
खामगाव- अखंड हिंदुस्तान चे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रां बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेताल वक्तव्य करून समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या प्रकरणी त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनातुन युवा हिंदू प्रतिष्ठान कडून आज 5 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.
आव्हाड यांनी श्री रामांबद्दल एकेरी शब्दाचा उच्चार करून ते मांसाहारी होते तसेच हिंदू धर्मीयांमध्येच फूट पडेल अश्या प्रकारचे दिशाभूल करणारे वक्तव्य त्यांनी केले.त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून रोष व्यक्त केल्या जात आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्माच्या आराध्य दैवत प्रभू श्रीराम बद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करून त्यांची विडंबना केली आहे. त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत या घटनेचा निषेध करीत युवा हिंदू प्रतिष्ठान तर्फे आ. जितेंद्र आव्हाड याच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठया संख्येत युवा हिंदू प्रतिष्ठान चे धर्मबंधु उपस्तीत होते.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
Post a Comment