घाटपुरी येथे जिजाऊ सावित्री दशरात्री उत्सव महिला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
घाटपुरी जनोपचार:- जिजाऊ सावित्री दशरात्री उत्सव महिला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मंगलमूर्ती नगर घाटपुरी येथे साजरी करण्यात आली. क्रायक्रमाचे दिप प्रज्वलन आमच्या मार्गदर्शक निसर्ग संस्थेच्या अध्यक्ष निताताई बोबडे आणि शोभाताई परदेशी , संध्याताई पदमने, पोटरेताई कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाग्यश्रीताई हिवराळे यांनी केले. सावित्रीमाईच्या वेशभूषेत अनन्या महाले आणि नीताताई धर्माळे, मंगलाताई गवई, परदेशीताई बोबळेताई यांनी भाषण आणि गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. करुणाताई गवई, अल्काताई चांदूरकर, अरुणाताई भारसाकले , कांताताई गवांदे, गौकर्णताई फेरण, दिपाली चांदूरकर,रेखा निंबोकार, रुपाली अडाव, चवरेताई, उमा तंबुळे,अनिता बोदळे,प्रमिला नेमाडे,रेखा सुरडकर, इंदुताई शेगोकार,वंदना पाटील, करुणा गवई,कविता ताई,वनिताताई. संध्याताई पदमने यांनी सूत्र संचालन केले.प्रास्ताविक करुणा गवई यांनी केले. आभार प्रदर्शन अरुणा भारसाकळे यांनी केले.
Post a Comment