2024 चा बेस्ट स्कूल अवॉर्ड....
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर ला
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण करणारे प्रा गुंजकर सर यांच्या स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर ला मुंबई येथे इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या 2024 चा बेस्ट स्कूल अवार्ड म्हणून गौरवण्यात आलेले आहे
या शाळेने अल्पावधीतच ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे जिजाऊ स्कूल स्कॉलर ही संपूर्ण जिल्हा व परिसरामध्ये हायटेक एज्युकेशन प्रणाली वापरणारी शाळा म्हणून सुद्धा या शाळेची ख्याती आहे या शाळेने लीड्स कंपनीच्या सोबत टाईप करून मुलांना अत्याधुनिक नीट व जे डबल इ फाउंडेशन वर आधारित अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलेला आहे शाळेने त्यासाठी प्रत्येक वर्गात टीव्हीवर नेट सर्वर व शिक्षकांना टॅब देऊन वेगळ्या प्रकारे शिक्षण प्रणाली अवगत केली आहे
त्या माध्यमातून दरवर्षी पालकांचे आकर्षण दिवसेंदिवस जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर कडे वाढत आहे त्याचाच परिणाम म्हणून जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर ने जिल्हाभरात ऍडमिशनचा सुद्धा उंचांक गाठलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन 2024 चा बेस्ट स्कूल अवार्ड म्हणून जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर गौरविण्यात आले आहे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः संस्थाध्यक्ष गुंजकर सर उपस्थित होते हा पुरस्कार स्वीकारत असताना हा सर्व जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर च्या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या मेहनतीचा श्रेयाचा वाटा असे स्वतः पुरस्कार मिळाल्यानंतर प्राध्यापक गुंजकर सरांनी विचार व्यक्त केले अशी माहिती संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख नवनीत पुंडकर यांनी कळविली आहे
Post a Comment