घिर्णी येथे पत्रकार मेळावा 

मलकापूर तालुक्यातील घीर्णी येथे पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय पत्रकार मेळाव्याचे व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुवार 18 जानेवारी रोजी  करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.आ. चैनसुख संचेती  मा देवराम गवळी उपविभागीय पोलीस अधीक्षक, पितांबर जाधव ठाणेदार मलकापूर शहर, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, तर विशेष अतिथी म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बाळासाहेब दामोदर जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी, वीरसिंह दादा राजपूत जेष्ठ पत्रकार, गजानन ठोसर जेष्ठ पत्रकार, घिर्नी येथील प्रथम नागरिक पती भगवानभाऊ चोपडे, दिनकर गव्हाळे पोलीस पाटील हे होते. 


 यावेळी मलकापूर शहरातील संपादक व पत्रकारांना सप्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक ताणुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव गावंडे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पत्रकारीतेच्या माध्यमातून  जनप्रभोधन करून  लोकशाही बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांचे हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे स्वागत करण्यात आले यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष सुधाकर तायडे यांचा सर्व ग्रामस्थ व पत्रकार बांधव तसेच नाभिक सेवा संस्था मलकापूर यांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांमध्ये हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये बिस्मिल्ला खान पठाण यांना मलकापूर तालुका उपाध्यक्ष, किशोर सोनवणे यांना मलकापूर तालुका सचिव, गणेश झोपे यांना जिल्हा उपाध्यक्ष ( वृत्तपत्र वितरक विभाग) रामेश्वर गोरले तालुका अध्यक्ष ( वृत्तपत्र वितरक विभाग) यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्त पत्र वितरित करण्यात आले.जळगाव जिल्ह्यातून खास उपस्थित झालेले संजय तायडे यांना जळगाव जिल्हाध्यक्ष, युवराज तायडे यांना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, सदानंद वाघ यांना बोदवड तालुका अध्यक्ष, राजाराम शिरोळे यांना बोदवड तालुका उपाध्यक्ष शेख अशपाक यांना बोदवड तालुका सचिव पदावर नियुक्ती संचेती यांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करून करण्यात आली.कार्यक्रमांमध्ये मलकापूर आज तक च्या 2024 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. श्रीकृष्ण तायडे , सतीश दांडगे,गौरव खरे, स्वप्निल आकोटकर, समाधान सुरवाडे ,राजेश इंगळे ,  नथुजी हिवराळे, श्रीकृष्ण भगत, शेख निसार, मनोज पाटील, अशोक रवणकार, संदीप सावजी, उल्हास शेगोकार,   नारायण पानसरे, प्रा. प्रकाश थाटे, सय्यद ताहेर, मयूर लड्डा, कृष्णा मेहसरे, सुधाकर तायडे, जमील पत्रकार, अनिल गोठी, विजय वर्मा, गणेश पाटील, रामेश्वर गोरले, किशोर सोनवणे, बिस्मिल्ला खान पठाण, धर्मेश राजपूत, प्रदीप इंगळे, एड. दिलीप बगाडे , पंकज मोरे, भीमराज इंगळे, श्रावण पाटील, विलासभाऊ खर्चे, भाऊराव व्यवहारे, विनोद व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रमाला उपस्थित पोलीस बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण भगत  यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुधाकर तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पत्रकार बांधवांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू वनारे, तुळशीराम वाघमारे, संजयसिंग चव्हाण, दगडू सिंग, राठोड पंचमसिंग सिसोदिया, बाळू गव्हाळे, कैलास वाघ, विजय सिंग चव्हाण, सुरेश मराठे, व समस्त घिंर्णी ग्रामवासी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post