पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना कोण घालते खतपाणी?


खामगाव :- तालुक्यातील मोठ्या असलेल्या पिंपळगाव राजा हद्दीतील भालेगाव बाजार सह इतर काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांना कोण खतपाणी घालत आहे असा प्रश्न आता सामान्य जनता उपस्थित करीत आहे. गावात नेमण्यात आलेल्या पोलीस पाटलांकडून अशा अवैध धंदांची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित आहे ,मात्र बहुतांश ठिकाणी वरली मटका सारख्यांना व्यवसायांना पाठबळ  देण्यात येत असल्याची चर्चा आहे . अवैध व्यवसायिकांकडून मोठ्या मलिदा मिळत असल्याने याची खबरबात पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही किंबहुना पोलीस पाटलांकडून संबंधित माहिती पोलिसांना मिळत नसल्याने अवैध व्यवसायिकांचे चांगभले होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन भालेगाव बाजार सह इतर ठिकाणी सुरू असलेला अवैध व्यवसाय बंद करावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post