कलाध्यापक संजय गुरव यांचा उपक्रम
बोर्डीनदी स्वच्छता अभियानास लोकसहभागातून सुरूवात
खामगाव (प्रतिनिधी)- येथील शहरा लगतच असलेल्या घाटपूरी गावातून वाहणारी बोर्डीनदी स्वच्छता अभियान आज दि.१० नोव्हेंबर रोजी राबविण्यात आले असून हा या अभियानाचा दुसरा टप्पा होता.याआधी ०१ आक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त घेण्यात आला होता.यावेळी खामगाव शहरातील सामाजिक कार्य करणा-या व्यक्तींचा एक समुह बोर्डीनदी स्वच्छतादूत यांनी ही नदी वर्षभर कशी स्वच्छ कशी ठेवता येईल याकरीता घाटपूरी ग्रामपंचायतीचे सरपंच मा कुळसुंदर व सदस्य यांचे सोबत चर्चा करून अभियानास सुरूवात केली.
![]() |
जाहिरात फक्त १००₹ संपर्क 8208819438 |
या अभियानात स्थानिक सामाजिक संस्था चिऊताई घरकुल योजना,लाॅयन्स क्लब संस्कृती,तरूणाई फाऊंडेशन, निसर्ग बहुउद्देशीय संस्था,यूनि लिव्हर कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त सहभाग मिळाला.स्थानिक बेरोजगार बांधवांना यावेळी त्यांचे हाताला काम देऊन योग्य मानधन देवून सन्मानित करण्यात आले.यामधे अर्जुन ससाणे,अंबादास ससाणे,रवी ससाणे,गणेश ससाणे,यांना स्वच्छतादूत म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी लाॅयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष डाॅ.भगतसिंग राजपूत, तरूणाई अमोल तायडे फाऊंडेशनचे ,चिऊताई घरकुल योजनेचे संजय गुरव, सरपंच कुळसुंदर, निसर्ग संस्थेच्या निताताई बोबडे आदींनी मार्गदर्शन करून नदीचे महत्त्व समजवून सांगितले.यावेळी पक्षीमित्र कलाध्यापक संजय गुरव यांनी बोर्डीनदी स्वच्छतादूत अभियानात खामगाव शहरातील सर्व सामाजिक संस्थांना सामिल होण्याचे आवाहन केले.प्लास्टीक ,प्लास्टर ऑफ पॅरिस तथा निर्माल्य विसर्जनामुळे नदी खुपच दुरावस्था होत आहे व नदी पात्रातील जलचर मासे,कासव,खेकडे तसेच शंख -शिंपले यांचा जीव गुदमरून जातो आहे.करीता कोणीही नदी पात्रात अशा प्रकारे विसर्जन करून आपले आरोग्य धोक्यात येईल अशी कृती करू नये हाच या स्वच्छतादूतांचा मुख्य उद्देश आहे
.खामगाव (प्रतिनिधी)- येथील शहरा लगतच असलेल्या घाटपूरी गावातून वाहणारी बोर्डीनदी स्वच्छता अभियान आज दि.१० नोव्हेंबर रोजी राबविण्यात आले असून हा या अभियानाचा दुसरा टप्पा होता.याआधी ०१ आक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त घेण्यात आला होता.यावेळी खामगाव शहरातील सामाजिक कार्य करणा-या व्यक्तींचा एक समुह बोर्डीनदी स्वच्छतादूत यांनी ही नदी वर्षभर कशी स्वच्छ कशी ठेवता येईल याकरीता घाटपूरी ग्रामपंचायतीचे सरपंच मा कुळसुंदर व सदस्य यांचे सोबत चर्चा करून अभियानास सुरूवात केली.
या अभियानात स्थानिक सामाजिक संस्था चिऊताई घरकुल योजना,लाॅयन्स क्लब संस्कृती,तरूणाई फाऊंडेशन, निसर्ग बहुउद्देशीय संस्था,यूनि लिव्हर कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त सहभाग मिळाला.स्थानिक बेरोजगार बांधवांना यावेळी त्यांचे हाताला काम देऊन योग्य मानधन देवून सन्मानित करण्यात आले.यामधे अर्जुन ससाणे,अंबादास ससाणे,रवी तायडे,सुरेश गव्हादे,जानकीराम ससाणे,दिपकसिरसाट,गणेश ससाणे,यांना स्वच्छतादूत म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी लाॅयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष डाॅ.भगतसिंग राजपूत, तरूणाई अमोल तायडे फाऊंडेशनचे ,चिऊताई घरकुल योजनेचे संजय गुरव, सरपंच विष्णूभाऊ कुळसुंदर, निसर्ग संस्थेच्या निताताई बोबडे आदींनी मार्गदर्शन करून नदीचे महत्त्व समजवून सांगितले.यावेळी पक्षीमित्र कलाध्यापक संजय गुरव यांनी बोर्डीनदी स्वच्छतादूत अभियानात खामगाव शहरातील सर्व सामाजिक संस्थांना सामिल होण्याचे आवाहन केले.प्लास्टीक ,प्लास्टर ऑफ पॅरिस तथा निर्माल्य विसर्जनामुळे नदी खुपच दुरावस्था होत आहे व नदी पात्रातील जलचर मासे,कासव,खेकडे तसेच शंख -शिंपले यांचा जीव गुदमरून जातो आहे.करीता कोणीही नदी पात्रात अशा प्रकारे विसर्जन करून आपले आरोग्य धोक्यात येईल अशी कृती करू नये हाच या स्वच्छतादूतांचा मुख्य उद्देश आहे.यावेळी स्वच्छतादूत म्हणून गणेश कोकाटे,संदेश गुरव, सौ.मंगला गुरव, अनिकेत सातव,अरविंद देशमुख, राजेश थाडा, विजय जांगीड, राजेश शर्मा,गजानन सावकार, राजेश कोल्हे,चारूदत्त कांडेकर, गोपाल पवार, रमेश बोराडे,मंगेश टोपरे,कु.वैष्णवी जवळकार, गौरव इंगळे,विरेंद्र शाह आदींनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment