प्रहार च्या सेवाभावी संकल्पनेतून गोरगरीबांसाठी दिवाळीचे साहित्य वाटप : गजानन लोखंडकार यांच्या पुढाकार
प्रहार जनशक्ती पक्षाच्या सेवाभावी संकल्पनेची परंपरा कायम ठेवत प्रहार चे नेते गजानन लोखंडकार यांच्या पुढाकाराने आणि योगीराज घुले यांच्या प्रयत्नातून माटरगाव बु येथे गरजू गोरगरीबांना दिवाळीच्या निमित्ताने साहित्य वाटप करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चूकडू यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सेवाभावी संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना दिवाळीसारख्या सणाचा आनंद घेता यावा यासाठी मदत म्हणून दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येत असते.त्याच सेवेची परंपरा कायम ठेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील प्रहार नेते गजानन लोखंडकार यांच्या पुढाकाराने आणि योगीराज घुले यांच्या प्रयत्नाने गरजू लोकांना दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता
.
सदर चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसना वानखडे, पंकज आखरे, वैभव घाटे,महेश नागपुरे, गोपाल धोटे ,शुभम डुकरे,सुनील पिंपळजे ,गोपाल शित्रे, जितू राठी,गजानन निखाडे, वासुदेव वानखडे इत्यादींनी सहकार्य केले .
Post a Comment