मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघा चा जाहीर पाठिंबा
खामगाव- मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने खामगांव येथे दि.04-12-2023 रोजी दुपारी 4 वाजता भव्य दिव्य सभेचे नियोजन व आयोजन सकल मराठा समाज खामगाव च्या वतीने काँग्रेस भवन, बाबासाहेब आंबेडकर मैदान खामगाव येथे करण्यात आले आहे.*
*या प्रसंगी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलन समर्थनार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघांचा जाहीर पाठिंबा आहे,असे राष्ट्रीय चर्मकार महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष,माजी समाज कल्याण मंत्री मा.आमदार श्री.बबनरावजी घोलप व राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी च्या राष्ट्रीय अध्यक्षा वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांनी कळविले आहे.*
*तरी या प्रसंगी समाज बांधवांनी या भव्य सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन जाहीर पाठिंबा व सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ च्या वतीने करण्यात येत आहे.*
Post a Comment