गुजरात (सुरत) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 14 कुडो सेंट्रल गव्हर्नमेंट स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी


सुरत येथे दिनांक 22 ते 29 नोव्हेंबर पर्यंत कुडो राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये  खामगाव येथील गोल्डन बॉय म्हणून ओळख निर्माण करणारा 7 वर्षाचा चिमुकला रुद्रा निलेश चिंचोळकर या विद्यार्थ्यांने 14 वी सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल स्पर्धा, 15 वी अक्षय कुमार इंटरनॅशनल स्पर्धा व 4 थी फेडरेशन कप कुडो स्पर्धेमध्ये  प्रत्येकी एक असे एकूण तीन सुवर्णपदक पटकवुन गोल्डन बॉय म्हणून आपली ओळख निर्माण केली.म्हणून रुद्र चिंचोळकर याचा बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार सर व पोलीस कमिशनर अजय तोमर साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच श्रुती शिवशंकर आटोळे हिने सुद्धा या तिन्ही स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक प्राप्त करून जिल्ह्याचे नाव व खामगाव शहराचे नावलौकिक केले. त्याचबरोबर मोहम्मद फरान विद्यार्थ्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कुडो स्पर्धेमध्ये रजत पदक तर 15 वी अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो स्पर्धेमध्ये रजत पदक आणि 4 कुडो फेडरेशन कप मध्ये कास्यपदक पटकावले.

तसेच विराज गौरव बोबडे यांनी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट कुडो स्पर्धेमध्ये कास्यपदक तर 15 वी अक्षय कुमार इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केले.

वैभवी संतोष वरुडकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट कुडो स्पर्धेमध्ये आणि फेडरेशन कप मध्ये कांस्यपदक प्राप्त केले.

कुनाल राजेश सोनले यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट कुडो स्पर्धेमध्ये व फेडरेशन कप मध्ये कास्यपदक प्राप्त केले.

पल्लवी जोशी या विद्यार्थिनी अक्षय कुमार कुडो स्पर्धेमध्ये व फेडरेशन कप मध्ये रजत पदक पटकाविले.

तसेच अनिरुद्ध कुदाराम,अभय कुदाराम, कुणाल कोकरे ऋषिकेश थेलारे यांनी या स्पर्धेमध्ये आपले सहभाग नोंदवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थींनी आपल्या यशाचे श्रेय

कुडो असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र भाऊ रोहनकार, सागर दादा फुंडकर व प्रशिक्षक कुडो राजेश सोनले, यश सोनले तसेच आपल्या आई-वडिलांना देतात.


Post a Comment

Previous Post Next Post