जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर वामन नगर खामगांव :घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ.
भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा – वासुदेव रामभाऊ आमले
खामगांव येथील प्रसिध्द़ जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीर, वामन नगर खामगांव येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्रोत्सव़ मोठया थाटात साजरा केल्या जातो. सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजाचे श्रध्दास्थान आई कालिंकादेवीची मोठया भक्ती भावाने पुजा अर्चना केल्या जाते. या वर्षी रविवार दि.15 ऑक्टोंबर 2023 रोजी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास थाटात सुरवात होणार आहे.
![]() |
जाहिरात |
श्री कालिंकादेवी कासार समाज मंडळ खामगांव व्दारा संचालित जागृत देवस्थान श्री कालिंकादेवी मंदीराला दरवर्षी नवरात्रीत तिर्थक्षेत्राचे स्वरुप पावते. खामगांव शहरासह आजूबाजूच्या परिसरातील महिला भाविक भक्त़ नवसाला पावणारी आई कालिंका मातेच्या दर्शनासाठी गर्दी करतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवरात्रोत्स़व मोठया थाटात साजरा करण्यात येणार आहे.*
![]() |
Advt. |
*तसेच कासार समाज महिला मंडळातर्फे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जागृत देवस्थानाचे नवरात्री दरम्यान दर्शन घेऊन आर्शिवाद घ्यावा, नवरात्रोत्सवात दररोज रात्री 8.30 वा सामुहिक आरती करण्यात येते. या आरतीचा महिला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री कालिंकादेवी कासार समाजाचे अध्यक्ष श्री वासुदेव रामभाऊ आमले यांनी केले आहे.*
Post a Comment