बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क:-  वाढत्या ताणतनावामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आत्महत्या कशा कमी करता येतील याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक सप्ताह निमित्त स्थानिक सहकार विद्या मंदिरात आयोजित कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉक्टर कुणाल शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना ताण तणाव व्यवस्थापन, आत्महत्या संबंधी विचाराच्या वार्निंग साईन बद्दल यावेळी डॉक्टर शेवाळे यांनी मार्गदर्शन केले .सहकार विद्या मंदिरात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला शिक्षक वृंदांचा प्रतिसाद मिळाला

Post a Comment

Previous Post Next Post