दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव लगत असलेल्या घाटपुरी येथील पोस्टमन कॉलोनी मधील दोन तरुणांचे अपघाती निधन झाले . 30 सप्टेंबरच्या रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. अज्ञात वाहनाच्या कट नंतर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.शंकर तांदळे वय 30 व गोपाल गंगतीरे वय 28 असे या दुर्दैवी अपघातात मृत पावलेल्या युवकांचे नावे आहेत .घटनेमुळे घाटपुरी मध्ये शोककळा पसरली आहे.
Post a Comment