"एनसीसी च्या वतीने स्वच्छता ही सेवा व्रत"


 खामगांव- स्थानिक १३ महाराष्ट्र बटालियनचे  सीओ अमित भटनागर आर एम धर्मेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनात एनसीसीच्या वतीने एक घंटा एक तारीख,स्वच्छता ही सेवा व्रत,एक तारीख स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास अंतर्गत श्री जी वी मेहता नवयुग विद्यालय महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले.

या मोहिमेस संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरराव बुराडे,एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. एनसीसी कॅडेट तर्फे शालेय परिसरातील विवेकानंद पुतळा, विद्धेश्वर शिवालय,एनसीसी कार्यालय स्वच्छ करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर बुराडे यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद करून कॅडेट्सने नेहमी स्वच्छतेची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले. एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे यांनी एनसीसीच्या महाश्रमदानाची माहिती देऊन केवळ एक तास स्वच्छता मोहीम न राबवता आपण आयुष्यभर स्वच्छता राखली पाहिजे असे मत व्यक्त केले.


या मोहिमेत एनसीसी चे सर्व कॅडेट्स नी सहभाग घेतला होता. यावेळी शालेय कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post