दत्तगुरू मंडळाचा भव्य दहीहंडी उत्सव सोहळा उत्सव :समिती अध्यक्ष यश आमले

 खामगाव* ::-- दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तगुरु मंडळाचा भव्य दहीहंडी उत्सव घाटपुरी नाका येथे  सोहळा आयोजित करण्यात आला आहे, या उत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी यश उर्फ गोलू आमले यांची निवड करण्यात आली आहे. 


           जिल्ह्यात सर्वात मोठा दहीहंडी उत्सवापिकी मानल्या जाणाऱ्या दत्तगुरु मंडळाचा दहीहंडी उत्सव सोहळा गुरुवार ७ सप्टेंबर रोजी  विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  महिला भजनी मंडळाकडून पालखी सोहळा, भजन व टाळ मृदंगाच्या गजरात भगवान श्रीकृष्णाचे गाण्यावर पावली खेळणार आहेत. सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्णाची भव्य महाआरती पार पडणार असून त्यानंतर गोपाळकाला प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दत्तगुरु मंडळाचे गोविंदाचा दहीहंडी कार्यक्रम सुरू होणार असून रात्री दहा वाजेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. या सोहळ्याला खामगाव मतदार संघाचे लाडके आमदार अँड. आकाशदादा फुंडकर, महाराष्ट्र प्रदेश भाजप सोशल मीडियाचे संयोजक सागरदादा फुंडकर, उद्योजक संतोष देशमुख, परिसरातील ज्येष्ठ नागरिक शेखरकाका शेवलकर, भास्करकाका चेंडाळणे , रवीकाका निगम, दत्तगुरु मंडळाचे अध्यक्ष ओमभाऊ शर्मा ,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाच्या नियोजनाची बैठक रविवारी पार पडली. दत्तगुरु मंडळाचे अध्यक्ष ओमभाऊ शर्मा, विनोदसेठ डिडवानिया, धरमचंद सुराणा, भास्करकाका चंडाळणे, सुनील मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत सर्वानुमते उत्सव समिती गठीत करण्यात आली. सर्वानुमते या दहीहंडी उत्सवाच्या  समितीच्या अध्यक्षपदी यश उर्फ गोलू आमले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अजय किरकाळे, सचिवपदी दिनेश वैद्य, कोषाध्यक्षपदी मोहित आयलाणी, व्यवस्थाप्रमुख म्हणून शशांक वक्ते, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून अँड. रितेश निगम तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून पांडुरंग काळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला निलेश हांडके, अनिरुद्ध चेंडाळणे, सुरेंद्र पवार, संदीप भरडक, अनमोल शर्मा, रवी डोंगे, राजेश जवळेकर, सचिन असनमोल, चेतन घोडाळे, विजय किरकाडे, निखिल देशमुख, आकाश सातव, धनंजय देशमुख, अक्षय सातव, यश शर्मा, ज्ञानेश्वर ढगे, वैभव डबेकर, रोशन गायकवाड, स्वप्निल कुलकर्णी, अजय गावंडे आदि दत्तगुरु मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post