शांत समिति की बैठक : गणराया पुरस्कार पुरस्कार घोषणा

 शेगाव(कमलेश शर्मा) पोलीस स्टेशनच्या वतीने वर्धमान भवन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहराचे राजकीय सामाजिक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व उत्साह समितीचे अध्यक्ष शेखरजी नागपाल यांनी प्रशासनासमोर प्रमुख अडचणी ठेवल्या व अतिक्रमणाबाबत मुख्य भूमिका घेण्यास सांगितले मिरवणूक मार्ग याचे व्यवस्थित नियोजन करण्याचे सांगितले व त्यानंतर मोतीबाग व्यायाम व प्रसारक व बहुउद्देशीय संस्था शेगाव नागरी हक्क संरक्षण समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गणराया पुरस्काराची घोषणा केली पुरस्कार स्वरूपात आकरा हजार रुपये व फिरती ढाल.या पुरस्कारांमध्ये व प्रवेश हा निशुल्क राहील पुरस्कार वितरणाकरिता जे निरीक्षक समिती बनवण्यात आलेली आहे त्यामध्ये मोतीबाग व्यायाम प्रसारक बहुउद्देशीय संस्था यांचे दोन सदस्य पत्रकार प्रतिनिधी एक डॉक्टर संघाप्रती निधी एक नागरी हक्क संरक्षण समिती प्रतिनिधी 2 वकील संघापैकी एक प्राध्यापक संघापैकी एक अशी समिती गठिका करण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post